Pune Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला वेग ; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

 

ब्युरो टीम : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला वेग येणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली आहे. यामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमावारी बैठक झाली. या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने एएआय ओएलएस सर्वेक्षण करणार असल्याचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल व मोठ्या आकाराच्या विमानांना पुण्यातून उड्डाण करता येणार आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची या प्रकरणी भेट देखील घेतली होती. मुख्य सचिवांचीही या प्रकरणी भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओएलएस सर्वेक्षण करण्यास अखेरं मंजूरी मिळाली आहे.

पुणे विमानतळाच्या रन वेच्या विस्ताराची गरज

पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची आहे. त्यामुळे हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येत आहे.  गेल्यावर्षी 80 लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे आणि सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने