Pune Murlidhar Mohol : पुण्याच्या पैलवानानं मैदान मारलं, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ



ब्युरो टीम : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी, ९ जून २०२४ दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा. 86 हजार 369 मतांनी पराभव केला होता.  मोहोळ यांना पुण्यातील ब्राह्मण वस्ती असलेल्या पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळाले. कोथरुड, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. त्यांच्या एकगठ्ठा मतांनी मुरलीधर मोहोळ हे थेट महापौर पदावरुन खासदार आणि खासदार पदावरुन थेट केंद्रिय मंत्री झाले आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी मिळताच मोहोळ यांनी हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. बुथ कार्यकर्ता केंद्रीय मंत्री होतो हे भाजपमध्येच होऊ शकते. आता मिळालेल्या या मोठ्या संधीचे सोने करत पुण्यासह,महाराष्ट्र आणि देशाच्या विकासावर भर देणार आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने