Pune University : पुणे विद्यापीठातील गेस्ट हाऊसमधील अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी नेते राहुल ससाणे यांच्या नेतृत्वात कुलगुरूनां निवेदन

 

ब्युरो टीम ; विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने मा. कुलसचिव यांना लेखी निवेदन देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गेस्ट हाऊसमधील गैरप्रकारांची माहिती काल देण्यात आली आहे. विद्यापीठातील गेस्ट हाऊस ही फक्त विशिष्ट काही लोकांनी मक्तेदारी झाली आहे. गेस्ट हाऊसमधील रूम फक्त काही लोकांसाठी राखुन ठेवलेल्या आहेत. सध्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होण्यासाठी बराच कालावधी प्रक्रियेमध्ये जात असतो अशा वेळेस विद्यार्थ्यांसोबत काही पालकही विद्यापीठांमध्ये येत असतात अशा विद्यार्थ्यांना व पालकांना गेस्ट हाऊस मध्ये एक-दोन दिवसांसाठी राहणे आवश्यक असते परंतु संबंधित गेस्ट हाऊस कडून विद्यार्थी व पालक यांना कसल्याही पद्धतीचे सहकार्य केले जात नाही. इतर विद्यापीठांमध्ये गेस्ट हाऊस मध्ये विद्यार्थ्यांना काय शैक्षणिक कामासाठी राहण्याची वेळ आली तर अत्यंत कमी दरामध्ये खोल्या उपलब्ध करून दिले जातात परंतु आपल्याकडे तशी परिस्थिती नाही.

मुद्दा क्रमांक दोन - गेस्ट हाऊस मध्ये सातत्याने जेवणावेळी चालत असतात. हे सर्व जेवणामुळे कुणाच्या आदेशाने बोलतात आणि या ठिकाणी पार्ट्या करणारे लोक कोण आहेत याचा शोध विद्यापीठ प्रश्न घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा सध्या केंद्रबिंदू राहिलेला नसून इतर घटकांना जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. काल आम्ही माननीय कुलसचिव महोदय यांना लकी पत्राद्वारे या सर्व गैरप्रकारची माहिती दिली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ नवीन टेंडर प्रक्रिया राबवावी. व नवीन लोकांना काम करण्याची संधी द्यावी. वारंवार त्याच लोकांना टेंडर दिल्यामुळे त्यांच्याकडून दडपशाहीचे धोरण राबवले जात आहेत. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचे व पालकांचे मोठे नुकसान होत आहे. 

----

विद्यापीठामधील गेस्ट हाऊस हे पार्ट्या आणि जेवणावळीचा अड्डा बनले आहे. विशिष्ट लोक या ठिकाणी रूम घेऊन राहतात जेवण करतात आणि विद्यार्थी आणि पालक संघर्ष करत राहतात. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ नवीन टेंडर प्रक्रिया राबवून नवीन चालकास नियुक्त करावे म्हणजे हा गैरप्रकार थांबला जाईल. 

                - राहुल ससाणे ( विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ) 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने