Rishabh Pant Money Donation : विश्वचषकातधमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतची घोषणा; सर्व सत्रातून होतोय कौतुकाचा वर्षाव

 

ब्युरो टीम : विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने टी20 विश्वचषकातून टीम इंडियात दमदार  कमबॅक केलेय. दीड वर्षाखाली ऋषभ पंत याचा भीषण कार अपघात झाला होता. त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यानंतर त्यानं प्रचंड मेहनत घेत टीम इंडियातील स्थान मिळावले. टी20 विश्वचषकात शानदार फलंदाजी करत त्यानं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवलाय. आता टी20 विश्वचषकादरम्यान ऋषभ पंत यानं मोठी घोषणा केली आहे. युट्यूबमधून मिळणारी सर्व संपत्ती आणि विश्वचषकादरम्यान मिळणाऱ्या रक्कमेतील काही भाग दान करणार असल्याची घोषणा पंतने केली आहे. ऋषभ पंतच्या या निर्णायाचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. 

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने 18 मे 2024 रोजी यूट्यूब चॅनल सुरु केले होते. त्यावर आतापर्यंत सात व्हिडिओ अपलोड केले आहेत. पंतने एक लाख यूट्यूब सबस्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे यूट्यूबकडून ऋषभ पंत याला सिल्व्हर प्ले बटण पाठवले आहे. पंतने यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्व्हर प्ले बटण असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो YouTube मधील सर्व कमाई, त्याच्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह एका चांगल्या कारणासाठी दान करणार आहे. म्हणजे युट्युब चॅनलवरून पंत जे काही कमवणार आहे, ते सर्व दान करणार आहे. त्याशिवाय स्वत:च्या कमाईतील काही भागही तो दान करणार आहे. 

पंतने कम्युनिटी पोस्टमध्ये काय म्हटलेय ? 

ऋषभ पंतने कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले की, "हे सिल्व्हर प्ले बटण आपल्या सर्वांचे आहे. आतापर्यंत एक लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि आणखी लोक सामील होत आहेत. हा माइलस्टोन चिन्हांकित करण्यासाठी, मी माझ्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह  YouTube मधून मिळणारी सर्व कमाई चांगल्या कामासाठी दान करत आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग चांगल्या बदलासाठी आणि सुधारण्यासाठी करूया."

विश्वचषकात ऋषभ पंतचा धमाका, शानदार कामगिरी -

टी20 विश्वचषकात ऋषभ पंत याने शानदार कामगिरी केली आहे. न्यूयॉर्कच्या संथ खेळपट्टीवर त्यानं दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केले. विराट-रोहितला जे जमलं नाही, ते पंतने करुन दाखवलेय. बांगलादेशविरोधात झालेल्या सराव सामन्यात पंतने 53 धावांची शानदार खेळी केली केली. त्यानंतर आयर्लंडविरोधात पहिल्या सामन्यात नाबाद 36 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर पाकिस्तानविरोधात 42 धावांचे महत्वाचं योगदान दिले होते. अमेरिकाविरोधात 18 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरोधात पंतने केलेली 42 धावांची खेळी टीम इंडियाच्या विजयासाठी महत्वाची ठरली. दिग्गज फलंदाज तंबूत गेल्यानंतर पंतने एकहाती किल्ला लढवला होता. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने