Rohit Sharma : आयसीसी टी 20 वर्ल्ड स्पर्धेत रोहितला विक्रमाची संधी; ठरणार जगातला पहिला फलंदाज

 

ब्युरो टीम : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया असा महामुकाबला रंगणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी तर दक्षिण आफ्रिकेची पहिलीच वेळ आहे. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिली वेळ आहे. टीम इंडियाने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013 आणि टी 20 वर्ल्ड कप 2007 साली जिंकला होता. त्यामुळे टीम इंडियाकडे 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप आणि 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची दुहेरी संधी आहे. कॅप्टन रोहितने आतापर्यंत या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार बॅटिंग केली आहे. रोहितकडून अंतिम सामन्यातही अशाच विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा आहे. रोहितला अंतिम सामन्यात मोठा विक्रम ब्रेक करत इतिहास रचण्याची संधी आहे.

रोहित शर्माला एका टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. रोहितला या विक्रमासाठी फक्त 34 धावांची गरज आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरुबाज 281 धावांसह अव्वलस्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 255 रन्ससह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर रोहित शर्मा 248 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता रोहितला हा महारेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी 34 धावांची गरज आहे. आता रोहित दक्षिण आफ्रिके विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत रोहित व्यतिरिक्त टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादव याचाही समावेश आहे. सूर्या 196 धावांसह नवव्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा एकमेव फलंदाज आहे. क्विंटनने 204 रन्स केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने