RSS : अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने काय गमावले, आरएसएस च्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका



ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून दूर राहिलेल्या भाजपाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आले आहे. ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा “मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” हा  लेख लिहिला आहे.  रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले असून अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वत:ची किंमत केली, अशी जोरदार टीका त्यांनी केलीय.

रतन शारदा यांनी ऑर्गनायझरच्या लेखात कुणाचेही नाव न घेता भाजपा नेत्यांच्या अतिआत्मविश्वासावर टीका केली आहे. 'लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपा कार्यकर्ता आणि नेत्यांना वास्तवाचे भान आणून देण्यास पुरेसे आहेत. भाजपा नेत्यांना हे कळले नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पार ची दिलेली घोषणा हे त्यांचे ध्येय आहे. विरोधकांचे नाही,'  असेही त्यांनी म्हटले आहे. 

रतना शारदा यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की, 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले.'

भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचेही रतन शारदा यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले. 'महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली,' अशी टीका रतन शारदा यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने