Shahrukh Khan : किंग खान आहे खरोखर किंग; सर्वांत श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत देखील शाहरुख खान अव्वल स्थानी कायम

 

ब्युरो टीम : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या सिनेमांमुळे आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. 2023 मध्ये एकापेक्षा एक तीन सिनेमे बॉलिवूडला देत शाहरुख खान याने विक्रम रचला. सर्वांत श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत देखील शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय दाक्षिणात्य सिनेविश्वातील सुपरस्टार रजनीकांत, प्रभास, थलपती विजय आणि अल्लू अर्जुन यांना देखील शाहरुख खान याने मागे टाकलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ब्सच्या यादीत शाहरुख खानचे नाव आहे. यादीनुसार, शाहरुख खान एका सिनेमासाठी जवळपास 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेतो. शाहरुख खान याच्यानंतर सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार रजनीकांत आहे. रजनीकांत एका सिनेमासाठी 150 ते 210 कोटी रुपये मानधन घेतात.

तिसऱ्या क्रमांकावर विजय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता एका सिनेमासाठी 130 ते 200 कोटी रुपये मानधन घेतो. विजय याच्यानंतर अभिनेता प्रभास आहे. प्रभास एका सिनेमासाठी 100 ते 120 कोटी रुपये मानधन घेतो. पाचव्या स्थानी अभिनेता आमिर खान आहे. आमिर खान एका सिनेमासाठी 100 ते 175 कोटी रुपये घेतो. सहाव्या स्थानी अभिनेता सलमान खान आहे. सलमान एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो.

कमल हसन सातव्या क्रमांकावर आहेत, ते एका सिनेमासाठी 100 कोटी ते 150 कोटी रुपये मानधन घेतात. अल्लू अर्जुन 100 कोटी ते 125 कोटी रुपये फीसह 8 व्या स्थानावर आहे. नवव्या क्रमांकावर असलेला बॉलीवूडचा अक्षय कुमार 60 कोटी ते 145 कोटी रुपये शुल्क आकारतो. अशा प्रकारे भारतात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान अव्वल स्थानी आहे.

शाहरुख खान याची संपत्ती

शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खान याच्याकडे 6 हजार 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेता कुटुंबासोबत ‘मन्नत’ बंगल्यात राहातो. शिवाय किंग खान याच्याकडे कार कलेक्शन देखील फार मोठं आहे.

आमिर खान याच्याकडे 1 हजार 862 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सलमान खान याच्याकडे जवळपास 2 हजार 900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर रिपोर्टनुसार अभिनेता अक्षय कुमार याच्याकडे 2 हजार 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने