Sreya Bugade : प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता सूत्र संचलन करणार "ही" अभिनेत्री ; ‘ड्रामा जुनिअर्स’चे करणार सूत्र संचलन

 

ब्युरो टीम : ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. 10 वर्षे महाराष्ट्राला खळखळून हसल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर या टीममधील कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे आता झी मराठीवरील ‘ड्रामा जुनिअर्स’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ड्रामा जुनिअर्स’ या रिअॅलिटी शोचं श्रेया सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना श्रेयाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ बद्दल श्रेया काय म्हणाली?

‘चला हवा येऊ द्या’ मधून माझी जी ओळख निर्माण झाली होती ती कायम ठेवत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न ‘ड्रामा ज्युनियर्स’ मधून करणार आहे. एक सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षक आणि स्पर्धकांमधला दुवा जो असणार आहे त्याच काम मी करणार आहे. लहान मुलांचे अत्यंत उत्तम परफॉर्मेन्सस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे असणार आहे. ज्या ऑडिशन्स मी बघितल्या त्यात स्पर्धकांमध्ये एक वेगळीच चमक आणि ऊर्जा दिसतेय. ही मुलं इतर मुलांना फक्त आणि फक्त प्रेरणा देणार आहे, असं श्रेया म्हणाली.

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनियर्स’ च्या निम्मिताने झी मराठीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. श्रेयाने आपल्या नवीन प्रवासाच्या वाटचाली बद्दल व्यक्त होताना सांगितले, “मी पुन्हा एकदा रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण एका नवीन रूपात. मी ‘ड्रामा ज्युनियर्स’ मध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मला लहान मुलांसोबत काम करण्याची खूप सुंदर संधी मिळाली आहे. नवीन टॅलेंट, नवीन उत्साह आणि सर्व चिमुकल्यांबरोबर मज्जा येणार आहे. हे माझ्यासाठी नवीन आव्हान आणि अनुभव असणार आहे, असं श्रेयाने सांगितलं.

श्रेयाचं प्रेक्षकांना आवाहन

मला आशा आहे की जसं आतापर्यंत प्रेक्षकांनी मला प्रेम दिले आहे तसेच या नवीन भूमिकेसाठी ही त्यांचा पाठिंबा मला असणार आहे. मी स्वतः बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती. लहान मुलांबरोबर काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा आणि आव्हान आहे. त्यांची दिनचर्या सांभाळून त्यांच्यासोबत मूड सेट करून काम करणं एक वेगळा चॅलेंज आहे, असंही श्रेयाने यावेळी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने