Surykanta Patil : शरद पवारांना सोडण्याची खंत माझ्या मनात जरूर; पक्ष सोडलेल्या 'या' नेत्याने व्यक्त केली मोठी खंत

 

ब्युरो टीम : शरद पवारसाहेबांच्या बाबतीत माझा खूप राग होता. तो मी अनेकदा व्यक्त केला. शरद पवारांना सोडण्याची खंत माझ्या मनात जरूर आहे. रागात असताना मी विचार करायला पाहिजे होतं. पण तेव्हा मला माझ्यावर झालेला अन्याय मोठा वाटला. कदाचित माझी बुद्धी कमी असेल किंवा अनुभव कमी पडला असेल. मी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं भाजप नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं. नांदेडमध्ये त्या टीव्ही माध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा त्यांनी खंत बोलून दाखवली.

शरद पवारांबाबत काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात शरद पवारांची किमया पाहायला मिळते. पवारसाहेबांनी मला खूप मानसन्मान दिला. शरद पवारांची काय ताकद आहे आम्हाला माहित आहे. पवारसाहेबांनी जेव्हा अजितच्या युद्धाला तोंड द्यायचे ठरवलं. त्या दिवशीच वाटलं महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाचं वजन आता कमी होईल. शरद पवार म्हातारा झाल्यामुळे ज्या लोकांनी कमी आखलं, त्यांचं आकलन चुकीचं होतं. शरद पवार हे लहान आणि मोठा कधीच नसतात… शरद पवार हे शरद पवार आहेत, असंही सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

सूर्यकांता पाटील कोण आहेत?

सूर्यकांता पाटील या सध्या भाजपच्या नेत्या आहेत. याआधी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. हिंगोली नांदेड मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2014 ला त्यांनी डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी शरद पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलंय.

नांदेडच्या निकालावर काय म्हणाल्या?

नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. तर काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. यावर सूर्यकांता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नांदेड लोकसभेत भाजपाचा पराभव ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशोकराव भाजपात आल्याने आम्ही निर्धास्त होतो.काय घडलं आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही पण पराभव जिव्हारी लागला. अशोक चव्हाण भाजप आल्याने फायदा झाला की तोटा झाला याचा निर्णय अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी घ्यावा, असं त्या म्हणाल्या.

अशोक चव्हाण यांची मी विरोधक असले तरी शत्रू नाही. अशोकराव चव्हाण यांना मी दोष देणार नाही. अशोकरावांनी काँग्रेस सोडणे ही माझ्यासाठी आश्चर्याची घटना होती. अशोकरावांची भाजप येण्याची काय मजबुरी होती. मला कळलं नाही. मी त्यांना म्हटलं सुद्धा खूप आश्चर्य आहे. अशोकराव तुमचं स्वागत करू की खेद व्यक्त करू…भाजपात येऊन अशोकरावांचे वैयक्तिक खूप मोठे नुकसान झालं. केंद्रात मंत्रीपद देण्यासाठी अशोकराव लायक आहेत, हा निर्णय मोदी – शाह घेतील, असंही पाटील म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने