T 20 world Cup : भारताला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत तीनदा करावा लागला पराभवाचा सामना ; ही आहेत करणे

 

ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताने मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली आहे. भारताला या फेरीत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. साखळी फेरीत भारताचा कॅनडाविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाला. पण उर्वरित तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारत चांगली कामगिरी करून उपांत्य फेरी गाठेल अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण मागचा इतिहास पाहता क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. त्याला कारणंही तसं आहे. सुपर 8 फेरीत भारतावर तीनवेळा नामुष्की ओढावली आहे. 2009 मध्ये भारताने सुपर 8 फेरीतील तिन्ही सामने गमावले होते. 2007 मध्ये जेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्या पर्वात निराशाजनक कामगिरी राहिली. भारताने सुपर 8 फेरीत प्रवेश केला. पण दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केलं. या गटात शेवटचं स्थान मिळवून भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

2010 आणि 2012 वर्ल्डकप स्पर्धेतही असंच काहीसं झालं होतं. 2010 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजने पराभूत केले होते. सुपर 8 फेरीत तीन पराभव स्वीकारून भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. 2012 मध्ये तीन पैकी 2 सामने जिंकले. पण नेट रनरेटमध्ये खूपच मागे पडला. पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेला पराभूत कलं. पण ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. भारतापेक्षा पाकिस्तानचा नेट रनरेट चांगला होता आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.

टी20 विश्वचषकातील भारताचा प्रवास

2007- चॅम्पियन

2009- सुपर-8

2010- सुपर-8

2012- सुपर-8

2014- उपविजेता

2016- उपांत्य फेरी

20200- सुपर-12

2022- उपांत्य फेरी

टीम इंडियाचा मागचा इतिहास पाहता रोहित सेनेला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. कारण अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या संघांना दुबळं समजणं महागात पडू शकतं. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत मोठा उलटफेर केला आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. असं असताना भारताला विजयासह नेट रनरेटही चांगला ठेवणं गरजेचं आहे.  भारताचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तान, 22 जूनला बांगलादेश आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने