ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी महत्त्वाचा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे. या सामन्यात अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असूनही अमेरिकेने भारतासारख्या बलाढ्य संघासोबर एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पहिलं षटक अर्शदीप सिंगच्या हाती सोपवलं. पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने अमेरिकेला दणका दिला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने शायन जहांगीर याला बाद केलं. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणार अर्शदीप चौथा गोलंदाज आहे.
अर्शदीप सिंग याच्या आधी बांगलादेशच्या मशरेफ मुर्तजा, अफगाणिस्तानच्या शापूर जादरान आणि नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमॅनला ही कामगिरी करता आली आहे. नामिबियाच्या रुबेन अशी कामगिरी दोनदा केली आहे. 2014 मध्ये मशरेफ मुर्तजाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. 2014 मध्येच अफगाणिस्तानच्या शापूर जादरानने हाँगकाँगविरुद्ध पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमॅनने 2021 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध, तर 2024 मध्ये ओमानविरुद्ध पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे.
अर्शदीप सिंगच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही त्याने विकेट गेतली. अँड्रीस गौसला बादल केला. अर्शदीप सिंग पहिल्याच षटकात दोन गडी बाद करणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा कारमना नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमॅनने ओमानविरुद्ध आणि फजलहक फारुकीने युगांडाविरुद्ध केला होता. अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत एकूण 4 गडी बाद केले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.
टिप्पणी पोस्ट करा