ब्युरो टीम : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 37 व्या सामन्यात डी ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध नेपाळ हे आशियाई संघ आमनेसामने होते. या सामन्यात बांगलादेशने नेपाळवर 21 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने नेपाळला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं. नेपाळने या विजयी धावांचा पाठलाग करताना ठिकठाक बॅटिंग केली. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर नेपाळचा अनुभव कमी पडला. बांगलादेशने नेपाळला 85 धावांवर गुंडाळलं. नेपाळचं यासह वर्ल्ड कप मोहिमेत विजयी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. तर बांगलादेशचा हा तिसरा विजय ठरला.
बांगलादेशच्या या विजयासह सुपर 8चे सर्व संघ निश्चित झाले. बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहचणारा शेवटचा संघ ठरला. आता टीम इंडियाचा सुपर 8 मध्ये बांगलादेश विरुद्ध सामना होणार आहे. सेमील फायनलमध्ये पोहचण्यासाठी एकूण 8 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. सुपर 8 मध्ये ए आणि बी ग्रुपमध्ये 4-4 संघ विभागण्यात आले आहेत. त्यानुसार टीम इंडिया, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर बी ग्रुपमध्ये यूएसए, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा समावेश आहे. सुपर 8 मध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 3 संघांविरुद्ध खेळणार आहे.
इंडिया-बांगलादेश आमनेसामने
टीम इंडिया 20 जून रोजी सुपर 8 मधील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. तर दुसरा साम्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश अशी लढत होणार आहे. हा सामना 22 जून रोजी पार पडणार आहे. तर टीम इंडियाचा सुपर 8 मधील अखेरचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना 24 जून रोजी पार पडणार आहे.
बागंलादेशचा विजय, सुपर 8 मध्ये धडक
नेपाळ प्लेइंग इलेव्हन: रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), अनिल साह, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, गुलसन झा, सोमपाल कामी, संदीप जोरा, संदीप लामिछाने आणि अविनाश बोहरा.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तनझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तॉहिद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तांझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
टिप्पणी पोस्ट करा