T 20 World Cup : T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुणाचे पारडे जड ; विजेतेपदावर नाव कोरण्यास दिनही संघ उत्सुक

 

ब्युरो टीम : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज म्हणजेच 29 जून रोजी बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. IND vs SA सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्व जगाच्या नजरा लागल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा एकदा विजयासाठी सज्ज आहे. 2007 नंतर भारताने एकही T20 वर्ल्डकप जिंकला नाहीये. त्यामुळे T20 विश्वचषक जिंकायचा आहे. 2013 नंतरची ही त्यांची पहिली ICC ट्रॉफी असेल. भारताने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केलीये. तीन वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. परंतु दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज तिसऱ्यांदा संघाला हा दुष्काळ संपवायचा आहे.

दक्षिण आफ्रिकेचं ही विजेतेपदावर लक्ष

पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे लक्ष देखील पहिल्या विजेतेपदावर असेल. 1998 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकमेव आयसीसी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जिंकलीये. दक्षिण आफ्रिकेचा संघ 1992 पासून एकदिवसीय सामने खेळत आहे आणि 2007 पासून T20 विश्वचषक खेळत आहे, परंतु प्रत्येक वेळी ते उपांत्य फेरीला मुकले आहेत, आज त्यांना हेही दूर करण्याची संधी मिळणार आहे.

भारताकडून बुमराह, अर्शदीप, कुलदीप तर दक्षिण आफ्रिककडून रबाडा, नोरखिया, शम्सी यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक स्पर्धेतील हेड टू हेड बद्दल बोलायचे तर, या स्पर्धेत दोन्ही संघ एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत ज्यात भारताने 4 सामने जिंकले आहेत. तर आफ्रिकन संघाने दोनदा भारताचा पराभव केला आहे.

T20 आंतरराष्ट्रीय विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर तिथेही टीम इंडियाचा वरचष्मा आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 26 पैकी 14 वेळा टी-20 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे, तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर मात करताना दिसत आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने