T20 World Cup 2024 : आज सुपर-8 मध्ये भारत-अफगाणिस्तान भिडणार, जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन



ब्युरो टीम : टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेची सुपर-8 फेरी सुरू झाली आहे. या फेरीमध्ये आज, गुरुवारी (२० जून २०२४) भारतीय क्रिकेट टीमची मॅच अफगाणिस्तान विरोधात होईल. ही मॅच रात्री ८ वाजता कॅन केंसिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बारबाडोस येथे होणार आहे.

टी 20  वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत भारतीय क्रिकेट टीमची कामगिरी चांगली राहिली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय टीमनं युएसए, पाकिस्तान, आयलँड यांचा पराभव केला. तर, कॅनाडा विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली होती. आता भारतीय टीम सुपर-8 मध्ये पोहोचली असून तेथे त्यांची पहिली मॅच अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. केंसिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बारबाडोस येथे ही मॅच होणार असून भारतीय वेळेनुसार ती क्रिकेटप्रेमींना रात्री 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे. या मॅचचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. तर, लाइव्ह स्ट्रिमिंग Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

भारताची टीम  : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

अफगाणिस्तान टीम : रहमानुल्लाह गुरबाज़, इब्राहिम जादरान, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान (कॅप्टन), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने