ब्युरो टीम : अमेरिका आणि आयर्लंड
यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड या दोन्ही
संघांना प्रत्येक एक गुण मिळाला आहे. पण याचा थेट फटका पाकिस्तानच्या संघाला बसला
असून त्यांच्या संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून न्यूझीलंडचा संघ
बाहेर पडल्यानंतर अजून एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा संघ देखील आता टी-२०
वर्ल्ड कपच्या बाहेर पडलाय. पण दुसरीकडे मात्र यजमान अमेरिकेच्या संघाने यावेळी
पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अमेरिकेचा संघ हा टी-२० वर्ल्ड
कपच्या सुपर - ८ फेरीत खेळताना दिसणार आहे.
असा पडला पाकिस्तान संघ बाहेर
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यामध्ये शुक्रवारी
सामना होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे अमेरिका आणि
आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येक एक गुण मिळाला आहे. अमेरिकेचे या
सामन्यापूर्वी चार गुण होते. हा सामना रद्द झाला आणि त्यांना एक गुण मिळाले.
त्यामुळे आता अमेरिकेचे पाच गुण होतील. त्यांनतर पाकिस्तानने जरी अखेरचा सामना
जिंकला तरी त्यांचे चारच गुण होतील. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील
सामना पावसामुळे रद्द झाला आणि पाकिस्तानचा संघ अखेरचा सामना खेळण्यापूर्वीच
वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा