ब्युरो टीम : टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीम अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करीत विश्वविजेता बनली आहे. या निमित्ताने तब्बल तेरा वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप जिंकला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर झाला. हा सामना एकही सामना न गमावलेल्या दोन तगड्या संघांमध्ये म्हणजेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. भारताने दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य सामन्यात अगाणिस्तानतचा पराभव करत प्रथमच अंतिम सामन्यात धडक मारली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. टीम इंडियाला जवळपास ११ वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नव्हते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. मात्र या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला.
टिप्पणी पोस्ट करा