ब्युरो टीम : "ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पंधरा दिवसात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील", असा अंदाज आमदार रवी राणा यांनी केला आहे. देशातील विरोधक सुद्धा प्रधानमंत्री यांच्या कामाची स्तुती करतील.नवनीत राणा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत. अमरावतीच्या जनतेने नवनीत राणांना आशीर्वाद दिलाय,असंही रवी राणा यांनी म्हटलंय.
नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उडली ठेवली
रवी राणा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उडली ठेवली आहे. त्यातून पंधरा दिवसात उद्धव ठाकरे हे मोदींच्या सरकारमध्ये सामिल होतील. देशातील सर्व विरोधक हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करतील असा दावाही अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्यानंतर रवी राणांनीही उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील, असा दावा केलाय.
दीपक केसरकरांचेही मोठे दावे
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (2) सकाळी उद्धव ठाकरेंबाबत अनेक दावे केले होते. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय.
सी व्होटर्स एक्झिट पोलमध्ये ठाकरेंना किती जागा?
पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेली. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूतीची लाट असल्याचेही बोलले गेले. सी व्होटर्स एक्झिट पोलनुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा बाजी मारणार, एक्झिट पोलचा अंदाज
पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, अमरावतीमध्ये नवनीत राणा पुन्हा एकदा बाजी मारत दुसऱ्यांदा संसद गाठतील, असा अंदाज आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनीही दिनेश बूब यांना उमेदवारी दिल्याने अमरावतीमध्ये तिरंगी लढत झाली होती. दरम्यान, दिनेश बूब यांच्या उमेदवारीचा नवनीत राणा यांना फायदा होईल, असंही बोललं जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा