Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती



ब्युरो टीम : हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात.  हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. यावर्षी उद्या, शुक्रवारी (२१ जून २०२४) रोजी  वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे.  वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. चला तर,   यंदा वटपौर्णिमा शुभ मुहूर्त काय आणि या व्रताचे महत्व नेमके काय असते,ते जाणून घेऊ.

काय आहे महत्व? 

धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात, यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते, अशीही धार्मिक मान्यता आहे.

पूजेचा शुभ काळ 

ज्योतिषाचार्य संदीप कुलकर्णी ( MA - Astrology)  यांनी 'मराठी प्रिंट'सोबत बोलताना सांगितले की, 'यंदा वट सावित्री व्रत हे २१ जून २०२४ रोजी आहे. २१ जूनला ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे. यादिवशी (२१ जून) रोजी सकाळी ७. वाजून ३१ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार असून पौर्णिमा समाप्ती शनिवारी  (२२ जून) सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी होईल. वटपौर्णिमा पूजेचा शुभ काळ हा शुक्रवारी (२१ जून) रोजी पहाटे ५ वाजून २४ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने