Virat Kohali : रनमशीन विराट कोहलीच्या कारकिर्दीला ग्रहण ; ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला असा बाद

 

ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील शेवटचा आणि महत्त्वााच सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित या सामन्याच्या विजयावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या मनासारखा हा निर्णय झाला. कारण नाणेफेक जिंकली असती तर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली असती. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या षटकात दोन्ही खेळाडूंनी सावध भूमिका घेतली. मात्र दुसऱ्या षटकात विराट कोहली नको तेच करून बसला. आयपीएलसारखा फॉर्म त्याला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काही गवसलेला नाही. साखळी फेरीत फेल गेल्यानंतर सुपर 8 फेरीतही काही खास करू शकलेला नाही.

विराट कोहली आतापर्यंत टी20 वर्ल्डकपमध्ये 6 सामने खेळला आहे. मात्र त्याला एकूण 66 धावा करता आल्या आहेत. म्हणजेच 11 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. तसेच दोन वेळा त्याला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. साखळी फेरीत विराट कोहलीने आयर्लंडविरुद्ध 5 चेंडूचा सामना केला आणि फक्त 1 धाव करत बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा केल्या. इतकंच अमेरिकेविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला.

सुपर 8 फेरीत विराट कोहलीला सूर गवसताना दिसला. पण त्यातही काही खास केलं नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 24 चेंडूत 24 धावा केल्या. यात फक्त एकच षटकार मारला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत 37 धावा केल्या, यात 3 षटकार आणि 1 चौकार मारला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होत तंबूत परतला. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने