Weather Update Today : घराच्या बाहेर पडत आहात? पुढील काही तास महत्त्वाचे, काय सांगतोय वेदर रिपोर्ट, वाचा



ब्युरो टीम : आठवडाभर पावसाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा येत्या ४८ तासात राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यातही मुंबईत आज, बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरु असून येत्या काही तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशीवमध्येही जोरदार पाऊस कोसळेल. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात पुढील ३ ते ४ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसेल. तर, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने