ब्युरो टीम : लग्न समारंभात जाऊन पर्स, बॅग चोरी करणारा एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील एका लॉन्स मध्ये ३ जुलै २०२४ रोजी एक लग्न समारंभ होता. यावेळी किसनलाल बाबुलाल कोठारी यांची पुतणी हातातील पर्स बाजुला ठेवुन फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या, त्यावेळी एक अनोळखी मुलाने ती पर्स लंपास केली. या पर्समध्ये तब्बल ८ लाख ५० हजार रुपये होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाची नियुक्ती केली. या पथकाने लग्न समारंभ व्हिडीओ शूटिंग व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक गो-या रंगाचा मुलगा बॅग उचलुन घेवुन जातांना दिसुन आला. पथकाने सदरचे फुटेज सोशलमिडीया व्दारे तसेच गुप्तबातमीदारांना पाठविले होते. पथक दिनांक 13/07/24 रोजी सदर संशयीत मुलाचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गो-या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेवुन पत्रकार चौकाकडुन तारकपुर बस स्थानकाकाडे पायी जात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच तारकपुर रस्त्याने जावुन पहाणी करता एक 14 ते 15 वर्षे वयाचा गो-या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला. त्यास थांबवुन त्याचेकडे चौकशी करता तो अल्पवयीन (विधीसंघर्षीत) असल्याचे निष्पन्न झाले. सदर अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळुन आली. सदर रोख रकमे बाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने मागील 10 ते 12 दिवसांपुर्वी शिर्डी येथील लग्नातुन चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने सदर विधीसंघर्षीत बालकास 45,000/- रुपये रोख रकमेसह ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पो.स्टे. करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा