ahmednagar journalism : पत्रकारिता पदवी परीक्षेत कुलकर्णी, आगरकर यांचे यश


ब्युरो टीम: पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पत्रकारिता पदवी (मुद्रित/ छपाई माध्यमे) व पदव्युत्तर पदवी (मुद्रित/छपाई माध्यमे) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर केंद्राचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. 

नगरच्या केंद्रावर पत्रकारिता पदवी (बीजे) परीक्षेत कुलदीप कुलकर्णी, आकाश आगरकर, आदिनाश शिंदे यांनी यश मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अहमदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब धस, वामन सर व इतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने