ब्युरो टीम : उत्तरप्रदेशातील हाथरसमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडलीय. या घटनेत आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. मृताचा आकडा वाढण्याची शक्यताही आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.
हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत आहे. सत्संगामध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते, हे लोक मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, एटा येथील असल्याची माहिती समोर येत आहे. सत्संगाता झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी जीव गमावल्याचं सांगण्यात येत आहे.
#WATCH | Uttar Pradesh | Hathras Stampede | Visuals from the spot where the incident took place, claiming the lives of several people. pic.twitter.com/PzZOKhlEYe
— ANI (@ANI) July 2, 2024
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत संवेदना व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक्स मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या संवेदना दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसोबत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
जनपद हाथरस की दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद एवं हृदय विदारक है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) July 2, 2024
मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
संबंधित अधिकारियों को राहत एवं बचाव कार्यों के युद्ध स्तर पर संचालन और घायलों के समुचित उपचार हेतु निर्देश दिए हैं।
उत्तर प्रदेश सरकार में मा.…
टिप्पणी पोस्ट करा