Health Problem Snoring : घोरण्याच्या सवयीपासून हवीय सुटका? मग हे वाचाच



ब्युरो टीम :  झोपल्यानंतर घोरणे ही एक मोठी समस्या आहे. खरतर घोरणे हा एक असा कर्कश आवाज आहे, जो आपल्या घशातील सैल उतींमधून हवा जाते, व श्वास घेताना ऊती कंपन करतात, तेव्हा येत असतो. प्रत्येकजण कधी ना कधी घोरतो. परंतु काही लोकांसाठी ही समस्या असू शकते. कधीकधी हे गंभीर आजाराच्या स्थितीचं लक्षण देखील असू शकते.

चला तर, आज आपण असे काही सोपे उपाय जाणून घेऊ, ज्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

१) झोपताना तुमचं डोक काही इंच वर ठेवल्यानं नाकाचे वायुमार्ग उघडे राहतात, व घोरणे कमी होण्यास मदत होते. तुम्ही झोपताना डोके काही इंच वर राहावे, यासाठी उशी वापरू शकता.

२) धूम्रपान करण्याच्या सवयीमुळेही घोरण्याची समस्या उद्भवू शकते. 2014 च्या अभ्यासानुसार घोरण्याच्या समस्येचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे धूम्रपान करणे हे आहे. धूम्रपान केल्यानं ओएसएचा धोका वाढू शकतो. त्यामूळे धूम्रपान करू नका.

३) अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन अ‍ॅण्ड स्लीप रिचर्स सोसायटीच्या मते, दररोज 7 ते 9 तास झोप घेणं महत्त्वाचं आहे. तुमची जर दररोज पुरेशी झोप झाली नाही, तर तुम्हाला घोरण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

४) झोपण्याच्या पद्धतीत बदल केल्यानं घोरण्याच्या समस्येपासून तुमची काही प्रमाणात सुटका होऊ शकते. पाठीवर झोपल्यामुळे कधीकधी जीभ ही घशाच्या मागील बाजुला जाते, त्यामुळे घशातून हवेचा प्रवाह अंशत: अविरोधित होतो. हे थांबवण्यासाठी तुमची झोपण्याची पद्धत बदलू शकतो. तुम्ही पोटावर किंवा एका अंगावर झोपू शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने