Jaljivan Mission : या जिल्ह्यात जलजीवन योजनेत अनियमितता, स्वतंत्र चौकशी आयोग नेमण्याची भाजपची मागणी



ब्युरो टीम : अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये प्रचंड अनियमितता त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे काम आणि अपात्र ठेकेदारांना दिलेल्या कामाच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, व प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्राध्यापक भानुदास बेरड यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे . 

याबाबत बेरड यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना व प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविणारी योजना जलजीवन मिशन त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि वापरण्याचे पाणी आणण्यासाठी महिलांना होणारा त्रास वाचविण्यासाठी केलेली योजना आहे. या योजनेमध्ये विशेषता अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने काम होताना दिसत नाही, या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे. जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतच्या अनेक तक्रारी आहेत, या तक्रारीची सारी दखलही प्रशासन घेताना दिसत नाही. त्याचबरोबर ज्यांना अनुभव नाही, जे अपात्र आहेत, अशा अपात्र ठेकेदारांनाही हे काम दिले गेले आहे, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठेकेदारांना कामाचा अनुभव नसल्यामुळे कामाचां दर्जा राखला जात नाही आणि त्याचबरोबर ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना पाहिजे त्या पद्धतीने हे अपात्र ठेकेदार रिस्पॉन्स देताना दिसत नाहीत. त्यामुळे  भारतीय जनता पार्टी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत स्वतंत्र चौकशी समिती गठित करावी आणि नगर जिल्ह्याच्या जनतेला न्याय द्यावा आणि त्याचबरोबर अपात्र ठेकेदारांच्या टेंडर हे रद्द करावेत अशी विनंती त्यांना केली आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने