Kalki 2898 AD : अश्वत्थामा आजही जिवंत आहे का? 'कल्की 2898' या चित्रपटामुळे का सुरू झाली चर्चा? वाचा सविस्तर



ब्युरो टीम : 'कल्की 2898' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणनं सुमथीची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटामुळे अश्वत्थामाची चर्चा सुरू झाली आहे. 

अश्वत्थामा नेमका कोण होता? आजही तो जिवंत आहे का? असे अनेक प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात पडत आहेत. चला तर, आज आपण याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

पौराणिक कथांनुसार असं मानलं जातं की, अश्वत्थामा आजही पृथ्वीवर जिवंत आहे. भगवान श्रीकृष्णानं दिलेल्या शापामुळे तो अमर झाला असून पृथ्वीवर आजही भटकतो आहे. यामागे एक कथा आहे. त्यानुसार, महाभारत युद्धाच्या अठराव्या दिवशी अश्वत्थामानं पांडवांचा बदला घेण्यासाठी द्रौपदीच्या पाच पुत्रांचा वध केला होता. तसेच अभिमन्युची पत्नी उत्तरा हिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे श्रीकृष्ण क्रोधित झाले, व त्यांनी अश्वत्थामाला शाप दिला की, ‘हे अश्वत्थामा, तु चिरकाल अमर राहशील आणि अनंत काळ पृथ्वीवर एकटाच भटकशील. तु मरण्यासाठी तडफशील, पण तुला मरण येणार नाही.’ तेव्हापासून अश्वत्थामा आजही पृथ्वीवर भटकत असल्याचं मानले जाते. 

कोण आहे अश्वत्थामा?

अश्वत्थामा हा गुरू द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपी यांचा मुलगा होता. या दोघांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी तपश्चर्या केली होती. त्यावेळी भगवान शंकराने प्रसन्न होऊन द्रोणाचार्य व त्यांची पत्नी कृपी यांना वरदान दिले की, ‘एक तेजस्वी पुत्र त्यांच्या पोटी जन्म घेईल.’ त्यानंतर गुरू द्रौणाचार्य व कृपी यांच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला. मात्र, त्याचवेळी आकाशातून चारही दिशांनी घोडा ओरडल्याचा आवाज येत होत होता. त्यामुळे द्रौणाचार्य व कृपी यांनी त्यांच्या पुत्राचं नाव अश्वत्थामा  असे ठेवले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने