प्रा.महेंद्र मिसाळ, कर्जत : महाराष्ट्र भूमी हि संताची,क्रांतिकारकांची, राष्ट्रपुरुषांची, समाजसुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक संतानी भक्तीमार्गाने समाज परिवर्तन केले आहे.संत ज्ञानोबा, तुकोबा, कबीर असे थोर संत या भुमीत जन्मले. अनेक संतांनी भक्तीने ईश्वराला प्रसन्न करून घेतले असे आम्हीं ऐकलेले आहे.पण असे एक संत याच महाराष्ट्रातील कर्जत भूमीत जन्मले ज्यांच्या भक्तीने पाडुरंग केवळ प्रसन्न झाले नाही तर दरवर्षी त्या संताला भेटण्यास पांडुरंग स्वतः त्यांच्या जन्मगावी कर्जत येथे येतात. त्या महान संताचे नाव होते श्री संत गोदडमहाराज. अ.नगर मधील कर्जतमधे जन्मलेले या संताचे खरे नाव अमरसिंह होते. बालवयातच
पाडुरंगाच्या भक्तीचा ध्यास लागला.हातात टाळ घेवुन देवाच्या भक्तीत महाराज तल्लीन होत असे. स्वभावाने विरक्त व शीघ्रकोपी होते. पुढे त्यांची भेट संत एकनाथ महाराजांचे शिष्य नारायणनाथ यांच्याशी झाली. त्यांनी अमरासिहाला आनंद सम्प्रदायची दिक्षा देऊन स्वःताजवळची गोधडी त्यांच्या अंगावर टाकली व म्हणाले यापुढे तुझे नाव गोदड महाराज असेल.त्यावेळेपासून अमरसिंहचे गोदड असे नाव पडले.याच गोदड महाराजानी भक्तिने समाजातील जात धर्म पंथ भेद नष्ट करत समतेचा व एकतेचा संदेश दिला. देशात भक्तीने त्यांनी वेगळा ठसा उमटवला व समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. एके दिवशी दिंडीत महाराज पंढरपूरात चंद्रभागेच्या वाळवंटात भजन किर्तनात तल्लीन झाले असताना त्यांच्या राहुटीला पाय अडकून एक स्री खाली पडली.ती रागाने महाराजानां बोलली. गोदड महाराजांना अपमान सहन झाला नाही. त्यांनी स्वतःचे सर्व साहित्य तंबू, रथ, पताका जाळले व देहत्यागाची तयारी केली. त्यावेळी पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले व म्हणाले तू तुझ्या जन्मगावी कर्जत येथे संजीवन समाधी घे मी दरवर्षी तुला भेटण्यास कामिका एकादशीस येईन. महाराजंनी कर्जतला संजीवन समाधी घेतली. समाधी स्थळी सध्या भव्य मंदीर बांधले आहे. लाखों लोकांचे गोदड महाराज श्रध्दास्थान आहेत. तेंव्हापासुन पांडुरंग कर्जतला संत गोदड महाराजाना भेटण्यास येतात अशी अख्याका आहे.याच दिवशी कर्जतची यात्रा असते. यात्रेत पाळणे,दुकाने असतात. यात्रेवेळी गोदड महाराजांची व पांडुरंगाची रथात मिरवणूक काढली जाते. गोदड महाराजानी जगतारक, गोदड रामायन असे ग्रंथ लिहले.भक्तांनी जन्मस्थळी हि मोठे मंदीर बांधले आहे. संत गोदड महाराज कर्जतचे ग्रामदैवत आहेत.
गोदड महाराजांच्या दर्शनाने अनेकांचे दुःख दूर झालेले आहे. आजही सर्वधर्मीय लोक गोदड महाराज मंदिरात रोज दर्शन घेवुन दिवसाची सुरुवात करतात.दरवर्षी पुण्यतिथीला सप्ताह भरवला जातो. मंदीरात रोज महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात कर्जतला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते.
(लेखक हे सुप्रसिद्ध व्याख्याते आहे. )
टिप्पणी पोस्ट करा