MP Nilesh Lanke : म्हणून खासदार निलेश लंके दिवंगत माजी मंत्री अनिलभैय्या राठोडांच्या ओमीनीत झोपले



ब्युरो टीम : अहमदनगर पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून उपोषण आंदोलन करणारे खासदार निलेश लंके यांनी आंदोलन स्थळी मंडपात जागा नसल्याने आपला मुक्काम कै. आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या ओमिनी कारमध्ये आंदोलन स्थळी केला. अनिलभैय्या हयात असताना याच ओमिनी कार मधून प्रवास करायचे. लंके यांच्यासमवेत या कारमध्ये अनिलभैय्यांचे सुपुत्र विक्रम राठोड देखील मुक्कामी राहिले.

लंके यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील गावागावातील नागरिक या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी तसेच लंके यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या आंदोलनस्थळी येत आहेत. तसेच केवळ नगर दक्षिणच नव्हे तर नगर उत्तरेतीलही अनेक पीडित नागरिक पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराच्या  तक्रारी लंके यांच्यासमोर आंदोलन स्थळी येऊन मांडत आहेत. आंदोलन स्थळी दिवसा आणि रात्रीही मोठी गर्दी दिसून येत असून दोन दिवस उपोषण केल्याने लंके यांची तब्येत आता काहीशी खालवली आहे. या परिस्थितीत उपोषणस्थळी उभारलेल्या मांडवामध्ये अनेक कार्यकर्ते स्वयंस्कृतिने 24 तास थांबत आहेत. रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी या ठिकाणी जागाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे नेहमीच कार्यकर्त्यांची काळजी घेणारे लंके यांनी नगर शहराचे 25 वर्ष आमदार राहिलेले माजी मंत्री स्व.अनिल भैय्या यांच्या मारुती ओमिनी गाडीमध्ये रात्रीची विश्रांती घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने