ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी मॉस्को विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. भारत-रशियाची निकटता अमेरिका तसेच अनेक युरोपियन देशांना पचणारी नाही. त्याचवेळी रशियाच्या जवळ जाणाऱ्या चीनला सुद्धा ही गोष्ट आवडणारी नाही. अलीकडच्या काळात रशिया आणि चीनचे संबंध सुधारले आहेत. रशिया आणि चीनमध्ये व्यापार सुद्धा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींमुळे दोन्ही देश जवळ आले आहेत. पण यामुळे आपण भारतापेक्षा रशियासाठी अधिक जवळचे आहोत, अशी चीनची भावना झाली आहे. हा भ्रम रशियाने मोडला.
सोमवारी पीएम मोदी मॉस्को विमानतळावर पोहोचले, तेव्हा रशियाचे पहिले उप पंतप्रधान डेनिस मँटुरोव्ह तिथे मोदींच्या स्वागताला उपस्थित होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या स्वागतालाही रशियाचे दुसरे उप पंतप्रधान उपस्थित होते. पण डेनिस मँटुरोव्ह त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मोदी यांच्या स्वागताला डेनिस मँटुरोव्ह यांनी उपस्थित राहण. त्यांना कारमधून हॉटेलपर्यंत नेऊन सोडणं यातून रशियासाठी भारत किती महत्त्वाचा देश आहे तो संदेश जातो.
चीनलाही स्पष्ट संदेश गेला
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यानंतर स्थान असलेल्या व्यक्तीने मोदी यांचं स्वागत करण यातून चीनलाही स्पष्ट संदेश गेला आहे. शीत युद्धाच्या काळापासून भारताचे रशियासोबत घनिष्ठ संबंध आहेत. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या लष्करी स्त्रोतांवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारताला होणारी शस्त्रास्त्र निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे.
असा झाला दोन्ही देशांचा फायदा
रशिया एकाबाजूला युद्ध लढत असताना दुसऱ्याबाजूने भारताने आर्थिक ताकद देण्याच काम केलय. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात तेल खरेदी केली. त्यामुळे रशियाला महसूल मिळाला. भारताला स्वस्तात तेल मिळाल. ज्यामुळे दोन्ही देशांचा फायदा झाला. रशिया नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. भारताने सुद्धा आता रशियाला साथ दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा