Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर नोकरी जाणार की काय; पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल


ब्यूरो टीम : आयएएस पूजा खेडकर या वादात सापडल्या आहेत. हा वाद इतका वाढलाय की आता महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. पूजा अजूनही प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. त्यामुळे आधीच त्यांच्या गोष्टी वादात सापडल्या आहेत. पूजा खेडकर या एक नव्हे तर अनेक प्रकरणांमध्ये वादात सापडल्या आहेत. गुरुवारी पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले आहेत. प्रशिक्षणार्थी IAS पूजाची नोकरी जाणार की काय अशी देखील चर्चा आहे.

पूजा खेडकर वादात?

पूजा खेडकर या महाराष्ट्रातील असून २०२२ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. पूजा यांनी देशात ८४१ वा क्रमांक मिळवला होता. आता पूजा खेडकरचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दावा आणि वागणूक यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील पोस्टिंगदरम्यान त्यांची बरीच चर्चा होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पूजा खेडकर यांच्या गैरव्यवहाराबाबत अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला आहे.

पूजा खेडकर यांची बदली झाली आहे, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची बदली होणे फार कमी पाहायला मिळते. पूजा यांची बदली झाल्यानंतर आता त्यांच्याबद्दल अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. पूजा यांनी त्यांच्या खाजगी वाहनावर लाल-निळा दिवा लावल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची खोली ताब्यात घेण्यावरून त्या वादात सापडल्या आहेत. त्याच्या अपंगत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आधी त्यांनी स्वतःला अंशतः अपंग असल्याचे सांगितले होते. नंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे अपंग म्हणून वर्णन केले.

अंपगत्व बाबत प्रश्नचिन्ह?

पूजा यांना वैद्यकीय तपासणीसाठी अनेकवेळा बोलावण्यात आले मात्र त्या एकदाही गेल्या नाहीत असा देखील त्यांच्यावर आरोप आहे. परीक्षेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी स्वत:ला अपंग घोषित केले होते का, असा प्रश्नही लोक उपस्थित करत आहेत. एवढेच नाही तर पूजा यांन बनावट कागदपत्रे बनवून तिची जात वेगळी दाखवल्याचाही आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. UPSC उत्तीर्ण झालेल्या लोकांना LBSNAA मध्ये एक वर्ष प्रशिक्षण घ्यावे लागते. पूजा या अनेक प्रकारच्या बाबींमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे त्या नोकरी गमावणार का अशी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने