pune parking policy :: पुण्यातील रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करायची आहे? मग हे वाचाच


ब्युरो टीम: पुणे शहर वाहतूक विभागाच्यावतीने शहरातील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत प्रभात रोडवरील गल्ली क्र.१ मध्ये दक्षिणेस प्रथमेश सोसायटी व उत्तरेस पश्चिमेस अमित बोसम सोसायटीपर्यंत पी-१ व पी-२ दुचाकीकरीता तसेच दक्षिणेस असलेले लक्ष्मी निवास ते उत्तरेस असलेला अभिनंदन बंगलादरम्यान, दक्षिणेस असलेल्या लक्ष्मी निवास ते ग्रीनपार्क यातील सोसायटीचे प्रवेशद्वारसोडून, उत्तरेस असलेला अभिनंदन बंगला ते निसर्ग सोसासटी या ठिकाणी सोसायटीचे प्रवेशद्वारसोडून पी-१ व पी-२ चारचाकी वाहनाकरीता पार्कीग करण्यात येत आहे. तसेच उत्तरेस असलेल्या निसर्ग सोसायटीच्या बाहेरील बाजूस असलेले अॅड. अभ्यंकर चौक या ठिकाणी १५ फुट अंतरावर चारचाकी वाहनाकरीता पार्कीगची व्यवस्था करण्यात येत आहे.

कोरगाव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत कोरगाव पार्क लेन क्र. ७ रस्त्याच्या पूर्व बाजूस असणाऱ्या क्लोवर सोसायटी प्रवेशद्वार (ए) ते क्लोवर पार्क व्हयु सोसायटी प्रवेशदारापर्यंत एका बाजूला नो-पार्किंग करण्यात येत आहे.

वानवडी वाहतूक विभागाअंतर्गत ॲव्हेन्यु मॉलच्या मुख्य प्रवेशदापासून ५० मी. उजव्या बाजूस व ५० मी डाव्या बाजूस नो- पार्किंग करण्यात येत आहे, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील हांडेवाडी व कोंढवा वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

हांडेवाडी वाहतूक विभागांतर्गत श्रीराम चौकाच्या २० मी. पुढे ८० मी. रुणवाल सेहगल सोसायटी व संस्कृती सोसायटीचे अलीकडे असलेल्या गतीरोधकापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस ८० मी. पी-१  आणि रोडच्या उजव्याबाजूस ८० मी. पी-२ तसेच न्याती इस्टेट सोसायटी ते दिल्ली पब्लिक शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस १५० मी. पी-१ व रोडच्या उजव्या बाजूस १५० मी. पी-२ पार्किंग करण्यात येत आहे.

कोंढवा वाहतूक विभागातर्गत  ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटीमधील क्रोमा टाटा एन्टरप्रायझेस ते ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (८० मिटर) चारचाकी वाहनाकरीता पार्किंग तर  ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वार ते द आर्क प्रवेशद्वारापर्यंत (११५ मिटर) नो-पार्किंग करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १० ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने