Pune Rains : पुणेकरांनो काळजी घ्या, या धरणातून नदी पात्रात सुरू आहे विसर्ग



ब्युरो टीम : पुणे शहर व जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच हवामान खात्यानं या जिल्ह्याला आज ऑरेज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील खडकवासला व वडीवळे धरणातून नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्राच्या कडेला राहणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.

खडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वा. नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ही माहिती दिली. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनानं केले आहे. तसेच वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये  ५ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला  आहे.  पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक दोनचे सहाय्यक अभियंता यांच्या वतीने देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने