Pune :राष्ट्रपतींचा पुणे दौरा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

 


ब्युरो टीम: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २८ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २९ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. 

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ च्या  दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच राष्ट्रपतींच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

या शाळा राहणार बंद

राष्ट्रपतींच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने पेरिविंकल इंग्रजी माध्यम शाळा सुस, डॉल्फिन इंग्रजी माध्यम शाळा तापकीर वस्ती, विद्या व्हॅली शाळा सुस, श्रीनिवास पुर्व प्राथमिक शाळा, नानासाहेब ससार इमारत सुस, आदित्य पूर्व प्राथमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, पोद्दार जंबो किड्स सुसगांव, ट्री हाऊस माध्यमिक शाळा, पारखे वस्ती सुसगांव, आर्चिड आंतरराष्ट्रीय शाळा सुस, जिल्हा परिषद शाळा सुसगांव कमान, संस्कारोदय प्राथमिक शाळा, शितळादेवीनगर, लिटील बेरीएस पूर्व प्राथमिक शाळा ठकसेन नगर, किड्झी पूर्व प्राथमिक शाळा सुसगांव, श्री विद्या पूर्व प्राथमिक शाळा व ध्रुव ग्लोबल शाळा सिम्बायोसिस लवळे या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने