Rahat Fateh Ali Khan : राहत फतेह अली खान यांना खरचं अटक झाली का? स्वतः समोर येत दिली महत्त्वाची माहिती


ब्युरो टीम : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र, अटकेच्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण आता गायक राहत फतेह अली खान यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलं आहे.

व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान म्हणतात...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर राहत फतेह अली खान यांच्या अटकेबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत- टीम राहत फतेह अली खान', असे कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान यांनी म्हटले की, 'मी राहत फतेह अली खान, मी दुबईत गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. खूपच चांगली गाणी तयार होते आहेत, सगळं काही ठीक आहे. मी तुम्हाला हीच विनंती करू इच्छितो की, अशा वाईट अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नका. माझे शत्रू जसा विचार करत आहेत, तसे काहीच घडले नाही. अल्लाच्या कृपेने मी लवकरच माझ्या देशात परतेन आणि सुपरहिट गाणे घेऊन येतो आहे. संपूर्ण जगभरातील चाहत्यांना माझे आवाहन आहे अशा वाईट अफवांकडे दूर्लक्ष करा. तुमचाही वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या कलाकारांचा मान राखा, एवढे केले तर हा कलाकार तुमच्या साथीनेच उभा आहे.'


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने