Rain Alert : पावसाचा जोर वाढला, वाचा तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आलाय



ब्युरो टीम : महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तास पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याशिवाय, रायगड आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय.

नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे पालघर, नाशिक आणि कोल्हापूरलाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याभागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  धुळे, नंदुरबार, जळगाव, नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने