Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार? वाचा



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै २०२४ रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण या सादर करणार आहेत. 

आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल.अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.  या अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात वेळा अर्थसंकल्प सादर करणार्‍या निर्मला सीतारामण या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.  या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळणार? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी, नोकरदारांसाठी केंद्र सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मानक वजावटीमध्ये मर्यादा वाढवण्याची मागणी मंजूर केली जाऊ शकते. सध्या नवीन कर प्रणालीत ५०,००० रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. नव्या अर्थसंकल्पात ही मर्यादा १ लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांना आयकर अधिनियमांतर्गत दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच महिलांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास योजना सादर केल्या जाऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने