Women empowerment : उद्योग व्यवसायात नकार हा होकार समजून काम करा ; सोमेश्वर फाउंडेशन आयोजित महिला उद्योजिका मेळावा उत्साहात साजरा

ब्यूरो टीम : नुकत्याच झालेल्या जागतिक MSME दिनानिमित्त माजी नगरसेवक सनी  निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी भव्य महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. घोले रोडवरील पंडित नेहरू सभागृहात रंगणाऱ्या या मेळाव्याचे उदघाटन माजी नगरसेवक स्वातीताई निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले.  महिलाना आपल्या पायावर उभा करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या सोमेश्वर फाउंडेशन ल या मेळाव्यासाठी दे आसरा फाउंडेशन,  मराठा इंटरप्रन्युअर्स असोसिएशन व उडान फाउंडेशनने मोलाचा हातभार लावला आहे. 

या मेळाव्यात सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महिलांना आपल्या उत्पादनाचे व उद्योगांचे एक मिनिटाचे सादरीकरण करत आकर्षक बक्षिसे जिंकली. तसेच  याप्रसंगी विविध व्यवसाय उद्योगात उत्तम प्रगती करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. तेजस्विनी पिसाळ, सौ. वैशाली अपराजित व उडान फाउंडेशनच्या आरती तोशणीवाल या उपस्थित होत्या. 

यावेळी बोलताना सौ. तेजस्विनी पिसाळ उद्योग- व्यवसाय सुरू करताना  कुठलाही नकार हा होकार समजूनच काम करावे लागते तेव्हाच आपण आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. यासाठी उद्योगातून मिळवलेला पैसा पुन्हा उद्योगात खर्च केल्यास महिलाना उद्योगात प्रगती साधायला वेळ लागणार नाही. महिलानी आपल्याला आवडणाऱ्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी सातत्य दाखवणे गरजेचे आहे. असे देखील त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी महिलाना बोलते करत नवीन व्यवसाय सुरू करण्यास व  महिलांमध्ये व्यावसायिक मानसिकता निर्माण करण्यास पुढाकार घेतला.

महिलानी उद्योग व्यवसाय सुरू करताना सुरुवाती पासून आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे,. यासाठी  त्यांनी महिलाना आवडणाऱ्या खेळांच्या स्पर्धा घेत त्या माध्यमातून उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक शिस्तीचे धडे  सौ. वैशाली अपराजित यांनी महिलाना दिले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या खेळांच्या माध्यमातून महिला आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी याचे देखील मार्गदर्शन केले. व तुम्ही कुठलेही काम करा पण स्वत:साठी  रोज 20 मिनिटे देत व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी महिलाना दिला. 

यावेळी बोलताना स्वातीताई यांनी महात्मा फुले यांच्या 'मती विना नीती गेली' या ओळींची आठवण करून देत  आज कालच्या  महिलानी शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबासोंबतच व्यवसायात देखील प्रगती साधण्याचे आवाहन केले. छोट्या व्यवसायापासून सुरुवात करण्याचा सल्ला देखील त्यांनी महिलाना दिला. तसेच नवीन उद्योग सुरू करू पाहणाऱ्या महिलाना आर्थिक मदत करण्याचे देखील त्यांनी सांगितले.   

या मेळाव्यासाठी  शहरातील महिला बचत गट, विविध संस्था, उद्योग व व्यवसाय करणाऱ्या महिलानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. यावेळी मधुराताई निम्हण-वाळंज आभार मानले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने