Ahmednagar Manoj Jarange Patil :म्हणून सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये दुखू लागलंय, मनोज जरांगे पाटलांचा घणाघात



ब्युरो टीम :  'मराठा समाजाचे आंदोलन एक वर्ष झालं सुरू आहे. हे आंदोलन मोडलं नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये दुखू लागलेल असून यांनी आता आपल्याला त्रास देण्याची भूमिका घेतली आहे,'  असा घणाघात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केला.

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज, सोमवारी (१२ ऑगस्ट) नगर शहरात आली होती . त्यानंतर  आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सकल मराठा सेवा संघाच्या वतीने मनोज जरांगे  यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,' मराठा समाजात आता विभाग विभागामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र येत नाही   अस3 म्हणायचे. त्यानंतर म्हणायचं विदर्भ येथील मराठा एकत्र येत नाही, मराठवाडा व विदर्भाचे पटत नाही, असे सांगायचे व एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे काम आता केलं जात आहे. आता तुम्ही वेळीच सावध राहा. हे विभागांमध्ये का भांडण लावतात, हे आपल्याला कळत नाही. पण आता आपण सगळेजण एक आहोत,व जे असे भांडण लावतात त्यांनी या ठिकाणी येऊन बघावं की कसा मराठा एकवटला आहे,' असे आवाहन त्यांनी केले.

'मराठा आरक्षण देताना आता सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे एकमेकांच्या विरोधातील विभागाचा वाद उफाळून काढला. तो कसा काढला, हे आता आपल्याला माहिती नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचे आंदोलन मोडून काढायचं, असा डाव आखला जात आहे. पण आता मागे हटायचं नाही. तर आरक्षण दिलं नाही आपल्याला राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही, व सत्ता काबीज करावी लागणार आहे,' असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी आज जाहीर सभेमधून केली. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदारपणे टीका करत यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने