Ahmednagar : अहिल्यानगरमध्ये ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान 'पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे' आयोजन

                        


ब्युरो टीम : पं.दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार दि.३० ऑगस्ट ते सोमवार दि.२ सप्टेंबर या कालावधीत नगरकरांसाठी विचार प्रवर्तक आणि तरुणाईच्या जगण्याला वैचारिक बळ देणार्या 'पंडित दीनदयाळ व्याख्यानमाले' चे आयोजन येथील माऊली सभागृहात करण्यात आले आहे,अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक,चेअरमन तथा भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर शहरात सांस्कृतिक चळवळ सशक्त व्हावी,सामाजिक व राजकीय विषयांवर संवाद घडून सु-संस्कारित विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजात क्रांतीकारी बदल घडविण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.त्याला नगरकरांकडून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.  

या वर्षी येत्या शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ ते २ सप्टेंबर या कालावधीत माऊली सभागृहात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. शूक्रवारी, दि ३० रोजी या व्याख्यानमालेचे अध्यक्ष स्थान श्री क्षेत्र सरला बेटचे मठाधिपती,सद्‌गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे महंत रामगिरी महाराज भूषविणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प "द केरळ स्टोरी" या चित्रपटाची संपूर्ण कथा ज्यांच्या जीवनावर बेतलेली आहे, त्या खऱ्या नायिका केरळच्या औ.श्रुति गुंफणार आहेत.'लव्ह जिहाद : धर्मातराचं जळजळीत वास्तव ! ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.दुसरे प्रमुख वक्ते केरळ चे आर्ष विद्या समाजमचे संस्थापक केरळ चे आचार्य के.आर.मनोज यांचेही यावेळी व्याख्यान होईल.

शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायं.६ ते ९ यावेळेत माजी केंद्रीय मंत्री,मुंबईचे माजी पोलीस महासंचालक डॉ.सत्यपाल सिंह व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत."दहशतवाद असा संपवायचा असतो..!!' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. 

रविवार,दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.६ ते ९ या वेळेत  हैदराबाद येथील प्रसिद्ध तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री प्रखर हिंदुत्ववादी वक्ता श्रीमती माधवी लता "राष्ट्र माझे.. मी राष्ट्राचा..!" या ज्वलंत विषयावर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतील.यावेळी स्नेहालय संस्थेचे संघटक डॉ.गिरीष कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

सोमवार दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.६ ते ९ या वेळेत दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा प्रखर राष्ट्रभक्त विचारवंत पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचे विचार प्रवर्तक व्याख्यान होईल."हिंदूंनो.. सावधान..!" देश पोखरला जातोय !' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

व्याख्यानमाले चा समारोप प्रसंगी नगर जिल्हाचे माजी पालक मंत्री मा.आमदार प्रा.राम शिंदे, जनकल्याण समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.रविंद्र साताळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेसाठी नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन पंडित दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे यांनी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस सचिन पारखी,पं.दीनदयाळ परिवाराचे महासचिव बाळासाहेब भुजबळ,सुहास पाथरकर,संग्राम म्हस्के, संजय वल्लाकट्टी आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने