Bigg boss marathi : पॅडी कांबळेंच्या लेकीची जान्हवीसाठी सणसणीत पोस्ट



ब्युरो टीम : बिग बॉस मराठी मधील स्पर्धेक जान्हवी किल्लेकरने महाराष्ट्राचे लाडके विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी यांना तुम्ही 'ओव्हर अॅक्टिंग' करतात, असं म्हंटले होते. यावर आता पॅडीचे चाहते जोरदार टीका करीत आहे. आता अभिनेत्याच्या मुलीचीही एक भावुक पोस्ट समोर आलीय. पॅडी यांची लेक ग्रिष्मा कांबळे हिने जान्हवीला उद्देशून ही लांबलचक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.


काय आहे ग्रिष्मा कांबळेची इन्स्टाग्राम पोस्ट?

ग्रिष्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'प्रिय "अभिनेत्री" जान्हवी किल्लेकर, जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान @paddykamble ला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा नं ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं. खरंतर "overacting" हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, स्पर्धकांच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी विशेषत: वर्षा उसगांवकर आणि पॅडी कांबळे यांच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही. मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस.'


ग्रिष्मानं पुढं म्हंटले आहे की, ‘जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही....आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या,फुलवलेल्या career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं !! हा तुझा "Fair Game" संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव. त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने