रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टी वडगांव शहर यांचा स्तुत्य उपक्रम

 


     रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टी वडगांव शहर यांचे वतीने  केअरिंग हॅण्ड्स, आंबी , ता.मावळ या संस्थेतील सुमारे १०५ उपेक्षित बालकांनी देशभरातील त्यांच्या हितचिंतकांना आणि देणगीदार मान्यवरांनासाठी  स्वतः तयार केलेल्या राख्या पोस्टाने पाठविण्यात आल्या.

     वडगांव पोस्ट ऑफिस कार्यालय, पंचायत समिती प्रांगण येथे संपन्न झालेल्या या उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टी वडगांव चे शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , पंचायत समिती मावळ चे सभापती गुलाबराव म्हाळसकर , श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.नगरसेवक ॲड.विजयराव जाधव , किरण म्हाळसकर , भूषण मुथा , शरद मोरे , वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक ॲड.अजित वहिले, सामाजिक कार्यकर्ते देविदास जाधव , केरींग हँड्स संस्थेचे अंबादास चव्हाण , मानसी गायकवाड तसेच वडगांव पोस्टमास्तर वैशाली घोडेकर , कमल माजी, दिपाली गराडे आदी उपस्थित होते.

     या संस्थेच्या लहान मुलींनी भाजपा पदाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या प्रसंगी वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर यांनी या संस्थेच्या कार्याला आणि तेथील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. केरींग हँड्स संस्थेचे अंबादास चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने