CM Eknath Shinde : लाडकी बहीण नंतर आता लाडका शेतकरी योजना... मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा



ब्युरो टीम : बीडमध्ये परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये आज, बुधवारी (२१ ऑगस्ट २०२४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात आता लाडकी बहीण योजनेनंतर लाडका शेतकरी योजना राबवणार आहे, असं शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. यावेळी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान प्रमुख पाहुणे तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार पंकजा ताई मुंडे, आमदार सुरेश धस तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार,’ असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने