Dhanushyban : धनुष्यबानाच्या अडचणी वाढल्या ; पक्षातून बाहेर पडत केली नव्या पक्षाची स्थापना

 ब्युरो टीम : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी राजकारणातून संन्यास घेणार नाहीये. आता त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. आम्ही आमची स्वतःची संघटना बनवू. आमच्यासारख्याच विचारसरणीचा नवा जोडीदार मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत पुढे जाऊ. ही जनतेची मागणी आहे. चंपाई सोरेन यांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी झामुमोच्या अडचणी वाढू शकतात. कारण चंपाई सोरेन या सोरेन कुटुंबातील खास व्यक्ती आहेत. यामुळेच हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर त्यांनी चंपाई सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपदासाठी विश्वास व्यक्त केला होता. पण, तुरुंगातून बाहेर येताच हेमंत सोरेन यांनी पुन्हा सूत्रे आपल्या हाती घेतली. यावर चंपाई सोरेन यांनी आपला अपमान झाल्याचं म्हटलं होतं.

चंपाई सोरेन म्हणाले की, “आम्ही दिल्लीत कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. मी मुलाला आणि नातवाला भेटायला गेलो होतो. आरशाप्रमाणे आपण आपले विचार लोकांसमोर ठेवले आहेत. आदिवासी, दलित आणि गरिबांसाठी आम्ही पूर्वीपासून लढत आलो आहोत. भविष्यातही ते करणार. लोकांना त्यांचे हक्क मिळवून देणार. आम्ही एक नवीन सुरुवात केली आहे.

जितन मांझी यांच्या ऑफरवर काय म्हणाले?

जीतनराम मांझी तुमचे एनडीएमध्ये स्वागत करत आहेत. यावर चंपाई सोरेन म्हणाले की, जो कोणी आमचा शुभचिंतक आहे. त्यांचे आभार मानतो. आज भारत बंदची घोषणा करण्यात आली असून त्याला माझा नैतिक पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

चंपाई यांच्यावर अन्याय झाल्याचे चंपाई यांच्या गावातील आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. त्याचा अपमान करण्यात आला. बळजबरीने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून त्यांना हटवले गेले. आता झारखंड मुक्ती मोर्चाला विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. चंपाई मुख्यमंत्री राहायला हवे होते. भविष्यात ते जे काही पाऊल उचलतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ. स्वतःचा पक्ष काढा किंवा भाजपसोबत जा. ते भाजपसोबत गेले तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असेही काहींनी सांगितले.






0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने