Digital Media : येथे होणार मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा, एस.एम देशमुख यांची मोठी घोषणा



ब्युरो टीम : पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी-चिंचवड मधे होत आहे. या कार्यशाळेत यु ट्यूब,पोर्टल ऑनलाईन चॅनेल चे संपादक व सर्व पत्रकारांसाठी खास आकर्षण असणार आहे. गुगल आणि यु ट्यूब कडून बेनिफिट मिळण्यासाठी काय करावे लागणार या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा यशस्वी कशी करता येईल  या विषयी परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम देशमुख सर, राज्य अध्यक्ष शरद पाबळे सर, डिजिटल चे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनि उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. एकंदरीतच ही पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड मधे बैठक घेण्यात आली. तसेच संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या..

बैठकीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा संघटक अनिल वडघुले,कार्याध्यक्ष अविनाश आदक,उपाध्यक्ष सुरज साळवे,

डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष महावीर जाधव,विनय सोनवणे, रामकुमार शेडगे,पराग. डिंगनकर, पिंपरी-चिंचवड, पणे शहर संघटक चिराग फुलसुंदर,        समन्वयक पुणे जिल्हा मारुती बाणेवार,सागर सूर्यवंशी नितीन कालेकर,किसन भोसले, रमेश साठे सह आदींची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने