ब्युरो टीम: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सप्टेंबर महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ सप्टेंबर, मंचर येथे ९ व १० सप्टेंबर, जुन्नर येथे १८ व १९ सप्टेंबर, वडगाव मावळ येथे २४ व २५ सप्टेंबर तर लोणावळा येथे २६ व २७ सप्टेंबर या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा