Health Diabetes : हे तीन पदार्थ करतील मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रित



ब्युरो टीम : मधुमेह, वजन आणि हृदयाचे आरोग्य या तिघांचा काही ना काही संबंध आहे. संशोधनानुसार लठ्ठपणा हेदेखील मधुमेहाचे एक कारण असू शकते. लठ्ठपणामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा आणि हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होऊ शकतो. यामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो. मात्र, योग्य आहार या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा तीन पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्यापासून या आजारांना दूर ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

नाचणी

मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा नाचणी हा चांगला स्रोत आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मधुमेह आणि हृदयरोगानं ग्रस्त व्यक्तींसाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

हिरवे मूग

आहारात हिरव्या मुगाचा समावेश करा. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकारांपासून तुमचे रक्षण होते. ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्यानं हिरवे मूग खाल्ल्यानं शुगर लेव्हल नियंत्रित राहते. यामध्ये असलेले उच्च फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

बदाम

यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण उत्तम असते, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, व हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं वजन कमी करण्यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही बदाम खाणे फायदेशीर मानलं जातं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने