Health : तुम्ही सातत्याने मायक्रोवेव्हमध्ये अन्न तर शिजवत नाही ना ?



ब्युरो टीम : अन्न गरम करण्यासाठी बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी काही मिनिटांच्या आतच चहासकट कुठलाही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये पटकन गरम होऊ शकतो. शिवाय गरम होत असलेल्या अन्नावर लक्ष ठेवावे लागत नाही. मायक्रोवेव्ह मध्ये वेळ सेट केली की मायक्रोवेव्ह आपले काम पूर्ण करून आपोआप बंदही होऊन जातो.

अगदी भाज्या तयार करण्यापासून ते पॉपकॉर्न पर्यंत सर्व काही मायक्रोवेव्ह मध्ये अगदी काही मिनिटात तयार होते. पण मायक्रोवेव्हचा सातत्याने वापर करणे हे किती धोकादायक होऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे का ? मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. 

तज्ज्ञांच्या मते, मायक्रोवेव्हमध्ये जे अन्न गरम करतो, त्या अन्नातील पौष्टिक तत्वे कमी होतात. हे अन्न खाल्यामुळे तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो, आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. अन्नामध्ये पोष्टिकता नसेल, तर आपली त्वचा देखील खराब होऊ लागते.   मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न हे तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती आणि रोगांसोबत लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर हा कमीत कमी आणि गरजेपुरता करावा. जेणेकरून  आपल्याला पुढील धोके टाळता येतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने