Helath : बाणेर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटॅबॉलिक सायन्स व डॉ. तोडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन पॅथॉलॉजी, सी. टी. स्कन व ओ. पी. डी. सेंटरचे उद्घाटन संपन्न ; नागरिकांना मिळणार सवलतीच्या दारात आरोग्य सुविधा !

ब्युरो टीम :  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटॅबॉलिक सायन्स  व डॉ. तोडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन पॅथॉलॉजी, सी. टी. स्कन व ओ. पी. डी. सेंटरचे उद्घाटन राज्याचे माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये पुणे महानगरपालिका व जे. टी. फाउंडेशन यांच्या माध्यमातून रुग्णांना  माफक दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी पॅथॉलॉजी, सी. टी. स्कन व बाह्य रुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी माजीं नगरसेवक माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक गणेश कळमकर, माजी नगरसेवक ज्योती कळमकर, माजीनागार्सेवक अमोल बालवडकर, माजी सनदी अधिकारी प्रताप दिघावकर, कब्बडी संघाचे कार्याध्यक्ष बाबुराव चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. सतीश देशपांडे, डॉ. शंकरराव तोडकर, डॉ. जयश्री तोडकर आदि उपस्थित होते. 

आज भारत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करता असताना आपण देखील देशासाठी काही तरी देणे लागतो याचा भावनेतून काम करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटॅबॉलिक सायन्स  व डॉ. तोडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने बाणेर सारख्या भागातील नागरिकांना माफक दारात आरोग्य सुविध उपलब्ध करून देण्यासाठी या सेंटर सुरु करण्यासाठी  पुढाकार घेतला.  या सेंटरच्या माध्यमातून बाणेर परिसरातीलच नव्हे तर पुण्यातील नागरिकांना देखील सवलतीचा दारात आरोग्य सुविधा मिळणार आहेत. 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, हॉस्पिटल स्टाफ, बाणेर परीसारतील नागरिक देखील मोठ्या संख्नेने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने