Journalist :मराठी पत्रकार परिषदेच्या संघनात्मक बांधणीला प्राधान्य, नगरला पदाधिकाऱ्यांची बैठक



ब्युरो टीम : राज्यातील पत्रकारांची हित जोपासत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणारी, भरीव काम करणारी संघटना म्हणून  मराठी पत्रकार परिषदेकडे पाहिले जाते. पत्रकार परिषदेने संघटात्मक बाबीला प्राधान्य देत पत्रकारांसाठी नवीन उपक्रम राबवबाबत चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी यावेळी फोनद्वारे संवाद साधत सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर येथे रविवारी (दि. ११) मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख उपस्थित होते. अधिस्विकृती समितीचे नाशिक विभागाचे सदस्य व वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, ॲड. शिवाजी कराळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अनिल साठे, सचीन सातपुते, संदीप देहाडराय, सरचिटणीस महादेव दळे, राजेंद्र सावंत यांच्यासह पदाधिकारी व दक्षिणे जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषद गेल्या ९० वर्षापासून पत्रकारांसाठी काम करत आहेत. वैयक्तीक मदतीसह पत्रकारांच्या सार्वजनिक कामांतही परिषदेचा पुढाकार असतो. मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी ग्रामीण पत्रकारांसाठी विविध उपक्रमातून संघटनात्मक कामे करण्यावर भर देतात. पत्रकार हल्ला कायदा केवळ परिषदेमुळे झाला. शहरासह ग्रामीण पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका मिळावी यासाठी परिषदेचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पत्रकारांंसाठी सरकारी पातळीवरील योजनांचा लाभ मिळावा, पत्रकारासांठी नवीन उपक्रम आणि त्यासाठी परिषदेचे सुरु असलेले काम, नवीन सभासद नोंदणी, राज्यपातळीवरील द्वैवार्षिक अधिवेशन, आदी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. संदीप कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. विजयसिंह होलम यांनी परिषदेची पत्रकारांसाठीची भूमिका सांगितली. महादेव दळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने