ब्युरो टीम : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12 ऑगस्टला नगरमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नगर शहरासह सावेडी, केडगाव उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असेही आदेशात म्हटले आहे.
असा आहे शहरातील रॅली मार्ग
केडगाव येथे स्वागत – कायनेटिक चौक – सक्कर चौक – माळीवाडा बसस्थानक – मार्केट यार्ड चौक – माळीवाडा वेस – पंचपीर चावडी – आशा टॉकीज चौक – माणिक चौक – कापड बाजार – तेलिखुंट – चितळे रोड मार्गे – चौपाटी कारंजा (समारोप)
टिप्पणी पोस्ट करा